breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

चिंताजनक! लस घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण; ICMR च्या अभ्यासातून माहिती समोर

नवी दिल्ली |

करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. डेल्टा या करोना विषाणूच्या नवीन प्रकाराने तज्ञांची चिंता वाढवली आहे. करोना विषाणूचा डेल्टा प्रकार करोनावरील लस घेतलेल्यांना देखील संक्रमित करतो अशी माहिती आता समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चेन्नईमध्ये नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे या व्यतिरिक्त, ज्यांना आधी करोनाची लागण झाली नव्हती त्यांनाही संक्रमित करण्याची क्षमता डेल्टा विषाणूमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि चेन्नईमध्ये या अभ्यासाला मान्यता दिली आहे आणि १७ ऑगस्ट रोजी हा निष्कर्ष प्रकाशित झाला आहे. डेल्टा प्रकार किंवा बी.१.६१७.२ चा प्रसार लस घेतलेल्यामंध्ये किंवा लस न घेतलेल्यामध्ये वेगळा नाही. संपूर्ण जग सध्या करोना विषाणूच्या या डेल्टा व्हेरिएंटमुळे चिंतेत आहे. भारतात करोनाच्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि आता विविध राज्यांमध्ये हे रुग्ण आढळत आहेत. यासाठी करोनावरील लस घेतलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता.

डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतर कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोस दरम्यान न्यूट्रलायझेशन टायटर्समध्ये घट झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासात सहभागी असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे शास्त्रज्ञ जेरोम थंगराज म्हणाले की, “नमुन्याचा आकार लहान असल्याने त्यांनी पुन्हा संसर्ग झाल्याचे समाविष्ट केले नाही. कारण त्यांची संख्या खूपच कमी होती आणि लसीकरणानंतर लोकांना संसर्ग झाला की नाही हे पुढे वर्गीकृत केले गेले नाही.” ते म्हणाले की, “पूर्ण लसीकरण झालेल्या गटात कोणाचाही मृत्यू झाली नाही. तर तीन लसीकरण केलेले (रुग्ण) आणि सात लसीकरण न केलेले रुग्ण मरण पावले. मे मध्ये अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, ही माहिती तामिळनाडूच्या आरोग्य विभागाशीला देण्यात आली.” भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चेन्नई हे सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक होते. मे २०२१ च्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये दररोज सुमारे ६००० रुग्णांची नोंद होत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button