TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील या ४ प्रसिद्ध धबधब्यांना मान्सूनमध्ये नक्की भेट द्या !

गवळी देव धबधबा : हा धबधबा महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे आहे. हा धबधबा गवळी देव पक्षी अभयारण्यात असल्याने या धबधब्याला भेट देताना तुम्ही पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला १५ मिनिटांचा ट्रेक करावा लागेल.

GavliDev Waterfall & Bird Sanctuary
गवळी देव धबधबा

कालू धबधबा : कालू वॉटरफॉल हा धबधबा महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माळशेज घाटातील सर्वात उंच धबधबा आहे. कालू वॉटरफॉल जितका सुंदर आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहे. त्यामुळे काकालू वॉटरफॉल भेट देताना खूप काळजीपूर्वक ट्रेकिंग करावे लागेल.

कालू धबधबा

बावली धबधबा : हा धबधबा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. बावली धबधब्याजवळ बावली धरण आहे, त्यात बावली धबधब्याचे पाणी येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बावली धरणालाही भेट देऊ शकता. बावली धबधब्यावरून सह्याद्री पर्वत रांगेचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.

Bhavali Dam (Igatpuri) - All You Need to Know BEFORE You Go
बावली धबधबा

दोधनी धबधबा : हा धबधबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. दोधनी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी साधारण ३० मिनिटे ट्रेक करावा लागतो. दोधनी धबधब्याचे पाणी माथेरान पर्वतावरून येते. दोधनी धबधब्याजवळ गोदेश्वर धरण देखील आहे.

DODHANI Waterfall - DRONE Shots | How to reach Dodhani Waterfall | Panvel,  Maharashtra - YouTube
दोधनी धबधबा
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button