breaking-newsमनोरंजन

आदित्य पांचोलीने बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, बॉलिवूड अभिनेत्रीचा आरोप

काही दिवसांपूर्वी अभिनेता व निर्माता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आदित्य पांचोलीला १९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता गुन्हा दाखल करणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या जबाबात आदित्यने दारुच्या नशेत बलात्कार करून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

या अभिनेत्रीने २००४-०६ दरम्यान वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे आदित्य पांचोलीची तक्रार केली होती. परंतु तेव्हा या संबंधीत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वर्सोवा पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्या अभिनेत्रीने सांगितले की, २००४ साली अभिनेत्री होण्यासाठी ती मुंबईला आली होती. दरम्यान तिची ओळख आदित्यशी झाली. तेव्हा ही अभिनेत्री तिच्या मैत्रीणींसह हॉस्टेलमध्ये राहत होती.

२००४ साली ही अभिनेत्री आदित्यसह एका पार्टिला गेली. पार्टिमध्ये ड्रिंक प्यायल्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे वाटू लागले. हे सर्व आदित्यने केले असावे असा संशय त्या अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. पार्टी संपल्यावर आदित्य तिला घरी सोडेल असे म्हणाला आणि ती अभिनेत्री आदित्यवर विश्वास ठेवून त्याच्यासह घराच्या दिशेने रवाना झाली. आदित्यने यारी रोड जवळ गाडी थांबवली आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आदित्यने तिचे काही फोटो काढले आणि याबाबत त्या अभिनेत्रीला माहितीदेखील नव्हते असे ती म्हणाली.

या फोटोंवरुन आदित्यने अभिनेत्रीला धमकी देण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर अभिनेत्री तिच्या काकीच्या घरी राहण्यास गेली. आदित्य तेथे देखील त्याच्या मित्रांना घेऊन जात असे आणि अभिनेत्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असे. प्रत्येक वेळी आदित्य गुंगीचे औषध तिच्या ड्रिंक्समध्ये घालत असे आणि तिचे फोटो काढत असल्याचा अरोप त्या अभिनेत्रीने केला आहे.

आदित्यच्या वागण्याला कंटाळून २००६-०७ साली अभिनेत्रीने वर्सोवामध्ये एक फ्लॅट विकत घेतला. या फ्लॅटच्या खोट्या चाव्यादेखील आदित्य पांचोलीने तयार करुन घेतल्या होत्या. ही अभिनेत्री लोकप्रिय झाल्यानंतर आदित्यने तिच्याकडून फोटोसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. असे सर्व त्या अभिनेत्रीने तिच्या स्टेटमेंटमध्ये नमूद केले आहे.

वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्याविरूद्धचे पुरावे गोळा करणं हे कठीण असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी आदित्य पांचोलीने हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत व तिची बहिण रंगोली चांडेल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर न्यायालयाने या दोघींना याप्रकरणी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button