breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2023 : एमएस धोनीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला,..

MS Dhoni : आयपीएलचा १६ सीझन सुरू झाला आहे. चेन्नई संघाला कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सीझन असणार असल्याच्या चर्चा सातत्यांने होत आहेत. चेन्नईच्या होम ग्राउंडवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरूद्ध विजय मिळविला. दरम्यान स्वत: महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून पुर्णपणे निवृत्त घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

महेंद्र सिंग धोनी म्हणाला की, मी कितीही वेळ खेळलो तरी चालेल, पण हा माझ्या कारकिर्दीचा हा शेवटचा टप्पा आहे. त्याचा आनंद घेणे महत्वाचे आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे. इथे येऊन छान वाटतं. प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, या सामन्यात धोनीने मयंकला स्टंपआउट करून आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. धोनीने आपला २४० वा समाना खेळत असताना, विकेटच्या मागे अप्रतिम स्टंपिग करताना एका फलंदाजांला २०० वेळा बाद करणारा आयपीएल मधील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत पहिला यष्टीरक्षक बनला आहे, ज्याने एकूण २०८ घेतले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button