breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

पंढरपूर तालुक्यातील २ हजार शेतकऱ्यांची बँक खाती सील

पंढरपूर – गोरगरीब शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान पेन्शन योजनेत धनदांडगे शेतकरी घुसले आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच, या योजनेंतर्गत त्यांना मिळालेले पैसे त्यांनी परत करावेत अशा नोटीसा त्यांना पाठवण्यात आल्या होत्या. पण त्यांनी पैसे परत न केल्याने अखेर पंढरपूर तालुक्यातील २ हजार ४३ शेतकऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली.

२०१८ मध्ये केंद्र सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पेन्शन योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले. या योजनेतून शेतकऱ्यांना बी बियाणे तसेच इतर शेतीपूरक साहित्य् मिळावे यासाठी ही योजना आहे. त्यानुसार चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील ७९४४१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सदर केले. वास्तविक गरीब व अल्पभूधारक मजूर शेतकऱ्यांसाठी हि योजना आहे पण त्याचा धनदांडगे आणि बागाईतदार शेतकरी लाभ घेत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून धनदांडग्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले. आणि त्यांनी या योजनेतून मिळवलेली रक्कम परत करावी अशा त्यांना नोटीसा बजावल्या. पंढरपुरचे तहसीलदार सुनील बेल्हेकर यांनी ३ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले आणि त्यांना नोटीसा बजावल्या. त्यातील ९५७ शेतकर्यांनी १ कोटी रुपये परत केले. तर २०४३ शेतकऱ्यांकडून अजुन१कोति २० लाख येणे बाकी आहे. त्यामुळे या २ हजार ४३ शेतकऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button