breaking-newsमुंबई

संचालकाच्या मालमत्ता जप्त करून पैसे वसुल करा

  • एस. के. पाटील सह. बॅंक घोटाळा : हायकोर्टाचे अवसायकाला निर्देश
  • दोन महिन्यांत प्रगत अहवाल सादर करा

मुंबई – आर्थिक गैरव्यवहारामुळे अवसायानात आलेल्या एस के पाटील सहकारी बॅंकेला डबघाईत आणण्यास जबाबदार असलेल्या संचालकांविरोधातील कारवाई सुरूच ठेवा. त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव प्रकिया सुरू करा आणि पैसे वसुल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अवसायकाला दिले.

बॅंकेच्या अवसायकाने प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रकरणी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देताना या संचालकांच्या नावे असलेल्या मालमत्तांसह त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हस्तांतरीत केलेल्या मालमत्ताही जप्त करण्याची प्रक्रिया लवलकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी हमी दिली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना कारवाईचा प्रगत अहवाल दोन महिन्यांत सादर करा, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button