breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी! ४५ पैकी २२ वॉर्डमध्ये नियम लागू

उत्तर प्रदेश |

मथुरेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किमी क्षेत्र तीर्थस्थळ म्हणून घोषित केलं आहे. या भागात दारू आणि मांस विक्रीवर करण्यास मनाई असणार आहे. या भागात येणाऱ्या भाविकांची आस्थेचा विचार करता योगी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरेला आले होते. त्यांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. यावेळी साधूसंतांनी केलेल्या मागणीनुसार मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या व्यवसायामुळे प्रभावित लोकांना त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचा सल्लाही दिला होता.

योग्य आदित्यनाथ यांनी मथुरा जिल्हा प्रशासनाला आदेश दिल्यानंतर १० दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. “मथुरा वृंदावन क्षेत्रातील सुमारे १० चौरस किमी क्षेत्र तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. या भागात उत्पादन शुल्क आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडून पाहणी करण्यात येईल. त्यानंतर या भागातील परवाने रद्द करण्यात येतील”, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी इंडियन एक्स्प्रेला दिली आहे. या तीर्थक्षेत्राच्या अंतर्गत २२ वॉर्ड येतात. घाटी बहलराई, गोविंदनगर, मंडी रामदास, चौबियापाडा, द्वारिकापुरी, नवनीत नगर, बाणखंडी, भरतपूर गेट, अर्जुनपुरा, हनुमान टिला, जगन्नाथ पुरी, गौघाट, मनोहरपुरा, बैराजपुरा, राधानगर, बद्रीनगर, कृष्णानगर, कोयला गली, दंपियार नगर आणि जयसिंग पुरा या भागांचा समावेश आहे. योगी सरकारच्या या निर्णयानंतर साधूसंतांनी आनंद व्यक्त केला आहे. “मथुरा-वृंदावन हे भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून देखील महत्त्वपूर्ण आहे”, असं उत्तर प्रदेशच्या धार्मिक विभागाने अधिसूचनेत म्हटलं आहे. एक पवित्र स्थान माले जाते. येथे भारत आणि परदेशातून लाखो यात्रकरू भेट देतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button