breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील 20 हजारांचे कपडे लुटले

देहूरोड / महाईन्यूज

देहूरोड बाजारपेठेत जीवे मारण्याची धमकी देत शस्त्राचा धाक दाखवून गुंडांनी दोन कापड व्यावसायिकांकडून जवळपास 20 हजारांचे नवीन कपडे लंपास केले आहेत. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दहशतीचा प्रकार रेकॉर्ड झाला आहे. त्या आधारे देहूरोड पोलिसांचा तपास सुरू आहे.

अशा घटनांमुळे मेन बाजार, पारशी चाळ येथील व्यापारी भयभीत झाले आहेत. सशस्त्र असणाऱ्या गुंडांकडून जीवाचे बरे वाईट होऊ नये, या भीतीने व्यापारी त्यांच्या विरोधात बोलण्यासही धजावत आहेत. ‘शहरात पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे कमी झाल्याने यापुढे गुंडांना हप्ता देऊन स्वतःचे रक्षण करून घेण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली’ असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सूर्वे यांनी व्यक्त केली आहे.

देहूरोड शहरात गुंडगिरीला आळा घालण्यासाठी खमक्या पोलीस अधिकारी देहूरोड पोलीस ठाण्याला मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. भयमुक्त वातावरणात नागरिकांना राहता यावं यासाठी पोलीस आयुक्तांकडून निरनिराळ्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, देहूरोड सारख्या शहरात कायद्याचा धाक सर्वसामान्य नागरिकांना तर दहशत पसरवणारे गुंड उथळ माथ्याने मोकाट फिरत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button