breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

अशोक सराफ राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : जधानीस्थित विज्ञान भवन येथे हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्री, जी. किशनरेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल, विभागीय सचिव गोविंद मोहन तथा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा उपस्थित होते.

संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केले गेले. अकादमी पुरस्कार १९५२ पासून प्रदान केले जात आहे. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या श्रेणींमध्ये एकूण ९२ कलाकारांचा सन्मान करण्यातआला.

हेही वाचा – शरद पवार यांचा भाषणातून आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा; म्हणाले..

सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत संगीत नाटक अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये देशातील ९२ कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, यापैकी महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली या कलाकारांचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button