breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

छगन भुजबळांचं ‘त्या’ वक्तव्यावरून स्पष्टीकरण; म्हणाले,’सर्व नाभिक आणि मराठा..’

मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपुर्वी ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला. तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. यावरून छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं होतं की एका नाभिक समाजातील बांधवाने ओबीसींच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली तर त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला. मी म्हटलं की नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला तर तुम्ही एकमेकांचे केस कापत बसणार आहात का? ते वक्तव्य जनरल नव्हतं. त्या संबंधित बांधवावर झालेल्या अन्यायासंदर्भात वक्तव्य होतं. हे सर्व नाभिक समाजाला आणि मराठा समाजाला लागू होत नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा     –      ‘भारतीय लोक आळशी आहेत असे नेहरूंचे विचार होते’; पंतप्रधान मोदींची टीका

भुजबळांच्या त्या वक्तव्यावर मनोज जरांगे काय म्हणाले?

भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते, असं जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

नाभिक समाजातील एकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर मराठा समाजाने सांगितलं की याच्या दुकानात जायचं नाही. मी सर्व नाभिक समाजातील बांधवांना आवाहन करतो की असा बहिष्कार घालणार असतील तुम्हीही एकाही मराठ्याची हजामत करायची नाही, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button