breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराजकारणराष्ट्रिय

“मातृभाषांऐवजी हिंदी लादण्याचे प्रयत्न होतायत, आमचा हिंदी भाषेला विरोध नाही तर…”; स्टॅलिन संतापले

तामिळनाडू  |

मातृभाषेसाठी लढणाऱ्यांचा सन्मान करण्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी भाषेसंदर्भात मत व्यक्त केलंय. मोझीपोर म्हणजेच भाषेसंदर्भातील संघर्षासाठी प्राण गमावलेल्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्टॅलिन अण्णा (सीएन अण्णादुराई) १९६७ साली सत्तेत आले. त्यांनी राज्यामध्ये दुभाषिक धोरण राबवलं. त्यांनीच राज्याला तामिळनाडू असं नाव दिलं. हे नाव त्यांनी मोझीपोर मोहीमेनंतरच देण्याचा निर्णय घेतल्याचं स्टॅलिन यांनी सांगितलं. “आपल्याला आजही आपल्या राज्यांच्या भाषांचा सन्मान करुन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून ओळख मिळवून देण्याबद्दचे कायदे बदलण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय,” अशी खंत स्टॅलिन यांनी व्यक्त केलीय. “आपण तमीळ बोलत असल्याने आपण संकुचित विचारसणीचे आहोत असा त्याचा अर्थ होता नाही. केवळच हिंदीच नाही तर आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही,” असंही स्टॅलिन यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भाषा म्हणून हिंदीला आमचा मुळीच विरोध नाहीय. पण ती लादण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत त्याला आम्ही कठोर विरोध करत आहोत, असं स्टॅलिन यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. “आमचा हिंदीला विरोध नाही पण हिंदीची सक्ती करणं, हिंदी भाषणा लादण्याचा आमचा विरोध आहे. आम्हाला तमीळ भाषेबद्दल प्रेम आहे पण त्याचा अर्थ आम्ही इतर भाषांचा द्वेष करतो असं नाहीय,” अशी स्पष्ट भूमिका स्टॅलिन यांनी मांडली. याचप्रमाणे एखादी भाषा शिकणे हा प्रत्येक व्यक्तीचा ऐच्छिक विषय असायला हवा. ती भाषा शिकण्यासाठी त्याच्यावर दबाव आणता कामा नये, असंही स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं. “ज्यांना हिंदीची सक्ती करायची आहे त्यांना भाषा हा अधिकार गाजवण्याचं माध्यम वाटतं. ज्याप्रमाणे त्यांना केवळ एकच धर्म असावा असं वाटतं तसच त्यांना केवळ एकच भाषा असावी असं वाटतं,” असा टोला स्टॅलिन यांनी लगावला. “मातृभाषांऐवजी हिंदी लादण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आमचा यालाच विरोध आहे. त्यांना तमिळ आणि तमिळनाडू हे यामुळेच थोडं कडू वाटतं असेल,” असा चिमटाही स्टॅलिन यांनी काढला. तामिळनाडूचा चित्ररथाला परवानगी नाकारल्याने स्टॅनिल यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button