breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले: भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे

  • महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपाचे गणरायासमोर होणार ‘साकडे आंदोलन’

पिंपरी । प्रतिनिधी

संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरु आहे. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार आहे. घर कोंबडया सरकारमुळेच महाराष्ट्रात अत्याचार वाढले असल्याची सडेतोड टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली. तसेच अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरासमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार असल्याची माहिती खापरे यांनी दिली. खापरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना अनेक कुटुंबे अत्याचारांच्या भयाने धास्तावली आहेत. त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे.

पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही. उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ केला जातो. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणाऱ्यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी अशी प्रार्थना बंद मंदिरासमोर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सरकार पाहात आहे. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले आहे. घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवालही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button