breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

#Breaking! फोर्ड कंपनीचा भारतातील वाहन निर्मिती बंद करण्याचा निर्णय!

मुंबई |

अमेरिकेची वाहनं बनवणारी प्रमुख कंपनी फोर्ड मोटर भारतातील आपला गाशा गुंडाळणार असल्याची माहिती समोर येत आहे. देशात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लॉन्च केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं आहे. कारखाने बंद करण्यासाठी जवळपास एका वर्षाचा अवधी लागेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार आहे.

कंपनीचे साणंद आणि मराईमलाई येथे कारखाने आहेत. दरम्यान देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे देशात गाड्या विकत राहील अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्याासाठी डीलर्संना मदत होणार आहे. दुसरीकडे याबाबत फोर्ड मोटार कंपनीला ईमेलद्वारे विचारलं असता त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. गेल्या ऑगस्टमध्ये कंपनीने देशभरता एकूण १,५०८ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ४,७३१ वाहनांची विक्री केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६८.१ टक्क्यांची घट दिसून येत आहे. याशिवाय पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअरदेखील ०.६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ टक्के इतका होता. सध्या फोर्ड कंपनी भारतीय बाजारात फोगो हॅचबॅक, एस्पायर सेडान गाड्यांसह एसयूव्ही सेगमेंटमध्ये इकोस्पोर्ट, एन्डेव्हर आणि फ्रीस्टाइल मॉडेलची विक्री करत आहे. एन्डेव्हर भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ९२८ एन्डेव्हर गाड्यांची विक्री केली. तर फोर्ड फिगो या गाड्यांच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या महिन्यात फक्त ७ गाड्या विकल्या गेल्यात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button