पिंपरी / चिंचवड

जाब विचारल्याने दोघांना मारहाण, महिलेचा विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी

दरवाज्यात सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा आणि लाकडे टाकण्याबाबत जाब विचारल्याने चार जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. या घटनेत महिलेचे मंगळसूत्र आरोपींनी हिसकावले. हा प्रकार 21 एप्रिल रोजी रात्री भोसरी येथे घडला.

अक्षय संजय अग्रवाल, संजय ज्वारीमल अग्रवाल (वय 52), दोन महिला (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा, लाकडे त्यांच्या दरवाजात का टाकतो, असे विचारले असता आरोपी अक्षय याने अश्लील हावभाव करून फिर्यादीस शिवीगाळ केली. आरोपी अक्षय याच्या आई आणि बहिणीने फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादी यांचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना सिमेंटच्या ब्लॉकने मारले. संजय अग्रवाल याने फिर्यादीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. मारहाण करून आरोपी निघून गेल्यानंतर आरोपी अक्षय याच्या आईने फोन करून ‘केस मागे घे नाहीतर मी तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button