पिंपरी / चिंचवड

मेदनकरवाडी येथे दोन गटात भांडण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मेदनकरवाडी येथे दोन गटात भांडण झाले. यामध्ये दोन्ही गटातील व्यक्तींनी मारहाण करून महिलांचे विनयभंग केले. हा प्रकार रविवारी (दि. 24) रात्री मेदनकरवाडी येथे घडली.

संतोष झंजाड, आणि चार महिला (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे भांडण सुरु असल्याने फिर्यादी ते भांडण सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी सर्वांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे कपडे फाडून त्यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांचा भाऊ आणि आई यांना देखील आरोपींनी मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात एका महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार नितीन दत्तात्रय बोरकर आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या भावाला समजावून सांगत असताना आरोपी महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी नितीन याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. या भांडणात फिर्यादी यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मिनिगंठन, दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, कानातील रिंगा व मोठी कुडी हे दागिने पडून गहाळ झाले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button