breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरणाच्या जागा ताब्यात घेवून उद्यान, क्रिंडागणे विकसित करणार

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती 

पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या खुल्या जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. नाममात्र भाडे कराराने जागा घेवून प्राधिकरण, वाकड, चिखली यासह अन्य भागात उद्याने, क्रिंडागणे बनविण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसात जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबवून जागा ताब्यात घेणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांना दिली. 

यावेळी महापाैर राहूल जाधव उपस्थित होते. महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात नवनगर विकास प्राधिकरणाकडील जागा हस्तांतरित करण्याबाबत आज (शुक्रवारी) बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, प्राधिकरणाचे सीईआे सतीशकुमार खडके उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, महापाैरासह माझ्या प्रभागात अनेक जागा प्राधिकरणाच्या आहेत. त्यासह प्राधिकरणातील सेक्टर 13,14,16,18,20 यासह अन्य ठिकाणी जागा शिल्लक आहेत. प्राधिकरणाकडील मोकळ्या जागा एक रुपया या नाममात्र भाड्याने नागरिकांच्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध करण्यात घेतल्या जाणार आहे. तर उर्वरित कंपाऊड घातलेल्या जागा स्वच्छता करुन झाडेझुडपे रिकामे करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या काही प्रभागात मुलांना खेळण्यास क्रिंडागण, अबालवृध्द नागरिक, महिला, लहान मुला-मुलींना उद्याने तयार करण्यात येणार आहेत.याबाबत निर्णय झाला असून येत्या आठ दिवसात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button