breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘भाऊंनी जोडलेली माणसे हीच माझी ताकद’; अश्विनी जगताप

लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एक नवीन उर्जा मिळते

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान आज भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपा सौ.आरती चोंधे यांच्या विशाल नगर, पिंपळे निलख येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एक नवीन उर्जा मिळाली. भाऊंनी जोडलेली माणसे ही त्यांची ताकद होती. हीच ताकद आज माझ्या सोबत उभी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

यानंतर अश्विनी जगताप यांनी गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सांगवीतील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्या काल्याच्या कीर्तनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी सांगवी परिसरातील भाविक भक्त, मा.उपमहापौर सौ.नानी घुले, मा.नगरसेविका सौ.नीता पाडाळे, मा.नगरसेवक श्री.प्रमोद ताम्हणकर, पुणे नियोजन समिती सदस्य श्री.काळूराम नढे, मा.स्वीकृत सदस्य श्री.विनोद तापकीर, मा.स्वीकृत सदस्य सौ.वैशाली खाडे, सामाजिक कार्यकर्ते श्री.सोमनाथ तापकीर, श्री.कैलास सानप तसेच भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button