breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फुगेवाडी दुर्घटनेतील अधिका-यांवर गुन्हे दाखल करा – नगरसेवकांची मागणी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

फुगेवाडी दुर्घटनेतील अग्नीशमक जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांच्या कुटूंबियाना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. तसेच त्या जवानाला शहीद दर्जा तत्काळ मिळावा, याशिवाय सदरील प्रकरणी अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावेळी महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षसस्थानी होत्या.

फुगेवाडी दुर्घटनेत अग्नशमक दलातील जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांच्या मृत्यूप्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत तत्काळ देण्यात यावी तसेच जाधव यांना शहीद दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरात विविध सेवा वाहिण्यांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. तेथील कर्मचऱ्यांच्या सुरक्षा उपाय योजना केल्या जात नाहीत. काम पूर्ण झाल्यानंतर राडारोडा उचलला जात नाही. खडी, दगड रस्त्यावर पसरून अपघात होत आहेत. याला जबाबदार कोण? असे म्हणत महापालिका सर्व साधारण सभेत नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

या महासभेच्या कामकाजात भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, दत्ता साने, आशा शेंडगे, सीमा सावळे, हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, तुषार कामठे, राहुल कलाटे, स्वाती काटे, सुजाता पलांडे, राजू बनसोडे, बाबू नायर, तुषार कामठे, नाना काटे, विलास मडी गेरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शहीद जवान जाधव यांच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी आठ दिवसांत अर्ज पूर्तता केली जाईल. विम्याच्या माध्यमातून वीस लाखांपर्यंत मदत होईल. मजूर जामदार यांना दोन लाख पर्यंत मदत ठेकेदाराकडून दिली जाईल आणि आणखी मदत दिली जाईल.
-श्रावण हर्डिकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button