breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात 24 तासांत आढळले तब्बल 1,61,736 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नवी दिल्ली – महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील कोरोना परिस्थिती प्रचंड बिकट झाली असून देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तब्बल दीड लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 1,61,736 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 879 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,36,89,453 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,71,058 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 97,168 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,22,53,697 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 12,64,698 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

India reports 1,61,736 new #COVID19 cases, 97,168 discharges and 879 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 1,36,89,453
Total recoveries: 1,22,53,697
Active cases: 12,64,698
Death toll: 1,71,058

Total vaccination: 10,85,33,085 pic.twitter.com/ndxnchFoIp

— ANI (@ANI) April 13, 2021

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button