TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे : विद्युत, स्थापत्य विषयक कामांमुळे पर्वती जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (२२ सप्टेंबर) बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली.

पर्वती जलकेंद्रांतर्गत येणारा सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग एक-दोन, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्वेक्षण क्र. ४२ कोंढवा खुर्द आणि साईबाबनगर, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे विमानतळ, राजीव गांधीनगर नॉर्थ व साउथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली क्र. एक ते सहा, एकतानगर झोपडपट्टी, सिद्धेश्वर, कुमार समृद्धी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती या भागातही गुरुवारी पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button