TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

खेलो इंडियामध्ये आर्यन मार्शलच्या तीन खेळाडूंना सुवर्णपदक

शिलारु, हिमाचल प्रदेश येथे पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन

पिंपरी / प्रतिनिधी

खेलो इंडिया महिला लीग मध्ये संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स या संस्थेतील शरयू संतोष म्हात्रे हिने 12 वर्षाखालील वयोगटात 50 खालील वजन गटात दोन सुवर्णपदक पटकावले. लाईट कॉन्टॅक्ट व पॉईंट फायटिंग या प्रकारात या पदकावर मोहोर उमटवली. शिलारु, हिमाचल प्रदेश येथे पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या बरोबरच खुशी सागर रेवाळे हिने वरिष्ठ गटात 52 किलो खालील वजन गटात लौ किक प्रकारात सुवर्णपदक मिळवले. वैदही उमेश पवार यांनी वरिष्ठ गटात फुल कॉन्टॅक्ट प्रकारात 50 किलो खालील वजन गटात सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचे तसेच शहराच्या नाव लौकिकात भर घातली. संत तुकाराम नगर येथे आर्यन्स मार्शल आर्ट्स या संस्थेमध्ये संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. विजयी खेळाडूंचे वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल यांनी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र किक असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांनी पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button