breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेखव्यापार

आखाड पार्टीचा बेत करताय का? …चला तर मग आकुर्डी थरमॅक्स रोडवर “हॉटेल राजवर्धन”मध्ये!

आकुर्डी : अस्सल मराठमोळ्या रांगड्या कोल्हापुरी मटन-भाकरीची अस्सल गावरान चव घेण्यासाठी खवय्ये कायमच आतुरलेले असतात. त्यातच सध्या चिकन मटण रान या गावरान चवीसाठी नागरिकांना ओढा वाढला आहे.  पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती आकुर्डी भागात असलेल्या “हॉटेल राजवर्धन” १०० टक्के बोकडचे मटन भाकरीबरोबरच व सी फूडचा आस्वाद देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

‘हॉटेल राजवर्धन’ खवय्यांच्या जिभेचे लाड नेहमीच पुरवत आली आहे. त्यामुळे उद्योगनगरीबरोबरच आसपासच्या परिसरातून देखील खवय्ये याठिकाणी १०० टक्के शुध्द नॉन व्हेज खाण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. थरमॅक्स चौकातून आकुर्डी रोडवर गरवारे वॉल रोप कंपनीलगत सहजपणे दृष्टीस पडणारे हे ठिकाण. गेल्या बारा वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या “हॉटेल राजवर्धन”मधील कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा जीभेवर रेंगाळतो. या ठिकाणी मांसाहारी जेवणासोबत २५ हून अधिक व्हेज डिशने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मांसाहारी थाळीमध्ये राजवर्धन मटण थाळी, मटण मसाला थाळी, मटण फ्राय थाळी, मटण आळणी थाळी अशा ४ प्रकारच्या थाळी उपलब्ध आहेत. तश्या चिकन व गावरान चिकन मध्येही थाळी उपलब्ध आहेत. गावरान बोकडाच्या मटणाची चव तुम्ही न चाखल्यास याठिकाणची भेट अर्धवट राहिल, अशी खवय्यांची भावना आहे. अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये सह कुटुंबासोबत येतात. याठिकाणी कोणतेही मद्यपान करण्याची बंदी असल्याने सहकुटुंब जेवण करण्यासाठी प्रथम प्राधान्य देतात.

व्हेज डिशमध्ये राजवर्धन स्पेशल व्हेज, पनीर टिक्का मसाला, अक्का मसूर, काजू पनीर मसाला यासारख्या अनेक पंजाबी डिशेस व कोल्हापुरी पिठलं मटकी मसाला, मटकी फ्राय, कोल्हापुरी बैगन मसाला अशी मराठमोळ्या डिशेस उपलब्ध करून दिल्या आहेत. कोल्हापुरी मसाल्यांचा वापर ल्यानेे सर्व भाज्या एकदम चविस्ट बनतात. यासोबत बाजरी ज्वारी भाकरी, तंदूर रोटी, नान रोटी आदी सुविधा देण्यात येत आहेत.

क्वालिटी आणि क्वॉनटीटी मध्ये तडजोड नाही…

चवीत कोणतीही तडजोड न करता, खवय्यांच्या जिव्हेचे चोचले पुरविणारे ‘हॉटेल राजवर्धन’ अशी या कोल्हापुुरी हॉटेलची ओळख आहे. ‘हॉटेल राजवर्धन’ मधील अस्सल कोल्हापुरी टेस्टमुळे खवय्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाल्यांच्या योग्य मिश्रणामुळे प्रत्येक डिश कोल्हापूरची आठवण करून देते.

“ग्राहक देवो भव” आणि सचोटीने केलेला व्यवसाय या दोन गोष्टींच्या बळावरच एक तपांहून आधिक काळ सातारा जिल्ह्यातील मराठी माणूस पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत घट्ट पाय रोवून उद्योजक म्हणून उभा राहू शकला आहे, अशी प्रांजळ कबुली कराड तालुक्यातील उद्योजक बबन पवार यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button