breaking-newsक्रिडा

राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : पार्थ देवरुखकर, आदित्य तलाठी, सानिका भोगाडे यांची आगेकूच

  • रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 

पुणे – मुलांच्या गटात पार्थ देवरुखकर, चिनार देशपांडे व आदित्य तलाठी यांनी, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, चिन्मयी बागवे व पूर्वा भुजबळ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना 12व्या रमेश देसाई मेमोरियल बारा वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईतील जी. ए. रानडे टेनिस संकुलात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील बारा वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थ देवरुखकरने कर्नाटकाच्या क्रिश त्यागीचा 9-1 असा धुव्वा उडविला. तर महाराष्ट्राच्या चिनार देशपांडेने दिल्लीच्या हरिशरण भास्करनचा 9-5 असा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. आदित्य तलाठीने बिस्वास बिपर्शीचा 9-4 असा पराभव करून आगेकूच केली. बारा वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पूर्वा भुजबळने तामिळनाडूच्या व्ही.एस. वारुनिकाचा 9-1असा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या सानिका भोगाडेने उत्तरप्रदेशच्या सुयश चौधरीवर 9-5असा विजय मिळवला.

सविस्तर निकाल – 
बारा वर्षांखालील मुले – दुसरी पात्रता फेरी – विशाल प्रकाश (तमिळनाडू) वि.वि. मोहिल सिंग (दिल्ली) 9-4, आदित्य तलाठी (महा) वि.वि. बिस्वास बिपर्शी (पश्‍चिम बंगाल) 9-4, वंश कामरा (दिल्ली) वि.वि. नमिश शर्मा (उत्तरप्रदेश) 9-4, चिनार देशपांडे (महा) वि.वि. हरिशरण भास्करण (दिल्ली)9-5, सहा ड्रिक (महा) वि.वि. देवब्रत बॅनर्जी (महा) 9-2, पार्थ देवरुखकर (महा) वि.वि. क्रिश त्यागी (कर्नाटक) 9-1,

बारा वर्षांखालील मुली – पहिली पात्रता फेरी – पूर्वा भुजबळ (महा) वि.वि. व्ही.एस. वारुणिका (तमिळनाडू) 9-1, सानिका भोगाडे (महा) वि.वि. सुयश चौधरी (उत्तरप्रदेश) 9-5, गौरी माणगावकर (महा) वि.वि.आदिती लाखे (महा) 9-3, आनंदी भुतडा (महा) वि.वि. यागस्मिनी चक्रवर्ती (महा) 9-5, चिन्मयी बागवे (महा) वि.वि. प्रियांशी पाणिग्रही (ओरिसा) 9-3, त्रिभुवनी चेन्नमशेट्टी (तेलंगणा) वि.वि. स्नेह नांदल (दिल्ली) 9-1.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button