breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एअर इंडियाच्या अध्यक्षपदी विक्रम देव दत्त यांची नियुक्ती

 

नवी दिल्ली | प्रतिनिधी
 आयएएस अधिकारी विक्रम देव दत्त यांची एयर इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी एअर इंडियामध्ये प्रशासकीय बदल केले. त्यात दत्त यांची या पदावर नियुक्ती केली, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी विक्रम देव दत्त १९९३च्या बॅचमधील प्रशासकीय अधिकारी आहेत. कार्मिक मंत्रालयाने काढलेल्या आदेशात विक्रम देव दत्त यांची एअर इंडिया लिमिटेडचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय १९९२च्या बॅचचे आयएएस अधिकारी चंचल कुमार यांची राष्ट्रीय राजमार्गच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने एअर इंडियाची विक्री केली. त्यासाठी खासगी व्यवसायिकांकडून बोली मागवली होती. त्यात टाटाने एअर इंडिया विकत घेतली. यामुळे ७० वर्षांनी एअर इंडियाचा पुन्हा टाटा समूहात समावेश झाला. याच एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी विक्रम देव दत्त यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button