breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये गृहप्रकल्पांचे वर्षभरापासून भूमिपुजनाच्या प्रतिक्षेत

स्थानिकांच्या विरोधामुळे काम थांबले

पिंपरी|महाईन्यूज |प्रतिनिधी|

आर्थिक दुर्बल घटकातील आणि सर्वसामान्य वर्गातील कुटुंबांसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर 6 मधील भुखंडावर गृहप्रकल्पाचे नियोजन केले. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरा महिने उलटले. तरी देखील हा गृप्रकल्पा भुमिपूजनाच्या प्रतिक्षेत आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधापुढे नमते घेतलेल्या प्राधिकरण प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील नागरिकांच्या निवा-यावरील टांगती तलवार कायम आहे.

मोशी प्राधिकरण संतनगर सेक्टर 6 येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबासाठी (एलआयजी) योजनेअंतर्गंत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. या परिसरात एकूण सहा हजार घरांचे नियोजन आहे. दरम्यान, सेक्टर 6 मधील या भुखंडावर तुर्तास ईडब्लूएस 260 सदनिका बांधण्य़ात येत असून 29 कोटी 1 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर, एलआयजीमधून 124 सदनिका बांधल्या जात असून त्यासाठी 20 कोटी 67 लाखांची खर्च प्रस्तावित आहे.

या दोन्ही कामांची निविदाप्रक्रिया जानेवारी 2019 मध्ये पूर्ण झाली आहे. निविदाप्रक्रिया झाल्यानंतर ईडब्लूएस व एलआयजी ही घरे होणार, हे लक्षात आल्यानंतर तेथील नागरिकांनी विरोध केला. त्याला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथील लोकप्रतिनिधींनीही स्थानिकांना साथ दिली. मात्र, तेथे गरिबांसाठी होत असलेल्या निवा-याला त्यांनी विरोध केला. मात्र, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तसेच, अकरा महिने म्हणजे सुमारे वर्ष होत असताना देखील प्राधिकरणाकडून या प्रकल्पावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

प्रकल्प सद्यस्थिती
एकूण सदनिका  – 384
ईडब्लूएस – 260 (खर्च 29 कोटी)
एलआयजी – 124 (खर्च -20 कोटी)
कामाचे आदेश – 2 जानेवारी 2019
कंत्राटदाराचे नाव – पवार पाटकर कंन्ट्रक्शन 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button