breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या माजी महापालिका आयुक्तांच्या बदलीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा

पुण्याचे माजी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली आणि नव्या लॉकडाऊनवरुन आता महाविकास आघाडीमध्ये वादाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. गायकवाडांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे. बालगुडेंनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणाही साधला आहे.

“शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे” असा आरोप संजय बालगुडे यांनी केला.

“शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली. मुळात त्यांची नेमणूक होऊन जेमतेम सात आठ महिने झाले. मार्चमध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार महिन्यात त्यांनी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशासक म्हणून अतिशय उत्तम काम केले” असे बालगुडे यांनी पत्रात लिहिले आहे.

“पुण्यात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे श्रेय शेखर गायकवाड यांना जाते. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकारणे त्यांनी काढली. एका कर्तबगार अधिकाऱ्याची बदली करणे हे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे. काही सत्ताधाऱ्यांना आयुक्त हे आपल्या ताटाखालचे मांजर असते, असे वाटणे योग्य नाही.” असेही बालगुडे म्हणाले.

मात्र अद्याप यावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button