breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरमधील दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू

श्रीनगर – काश्‍मीरमध्ये आज निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. आर.थिरूमनी (वय 22) असे त्याचे नाव आहे. तो तामीळनाडूची राजधानी चेन्नईचा रहिवासी होता. आज सकाळच्या सुमारास श्रीनगर शहराच्या हद्दीलगत दगडफेक करणारे निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षावेळी एक दगड थिरूमनीला लागला. त्यामुळे डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, उपचारावेळी त्याचे निधन झाले. जम्मू-काश्‍मीरमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष होण्याच्या घटना सातत्याने घडतात. बऱ्याचदा दहशतवादविरोधी मोहिमेत अडथळे आणण्यासाठी निदर्शने करून स्थानिक जमाव सुरक्षा जवानांवर दगडफेक करत असल्याचे दिसून आले आहे. दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात निदर्शकांच्या मृत्यूच्या घटनाही घडतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button