breaking-newsमहाराष्ट्र

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या हाती नारळ द्यावा-सुरेश धस

राज्यभरात गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूत गिरणीच्या तीन कोटींच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यानंतर विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते या घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जाते. त्यामुळे आता शरद पवार यांनीच धनंजय मुंडेंच्या हाती नारळ द्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांच्याच आदेशाने पोलिसांनी सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल दाखल केला असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला. गुन्हे दाखल झाल्याचे वाईट वाटतं तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका. जिल्हा बँकेचा ठेवीदार गोरगरीब आहे हे पैसे न मिळाल्याने अनेकांची लग्नं मोडली. खोटं बोल पण रेटून बोल याचं भानही विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे असंही धस यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button