breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कामगारांच्या प्रश्नावरून पालिका अधिका-यांवर कारवाई 

  • राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे आदेश 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सफाई कामगारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. या प्रकरणात संबधित अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर व सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती कळविण्यास आयोगाने सांगितले आहे.

महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीकडे सुमारे ६०० सफाई कर्मचा-यांकडून दहा महिन्यात तब्बल १४० तक्रारी आल्या. राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने याची दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस दिली. तसेच, सफाई कामागरांच्या समस्या ३० दिवसात मार्गी लावण्याचे निर्देश दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत सफाई कर्मचा-यांच्या समस्यांवर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

या प्रकरणात दिशाभुल व कामचुकारपणा केल्याबद्दल कार्यकारी आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आता आयोगाने अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती मागितली आहे. गेली दहा महिने पाठपुरावा करुनही आयुक्तांनी दाद न दिल्याने आयोगाने दखल घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button