TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

टीईटी घोटाळ्यात शिंदे गटातील आणखी एक आमदार गोत्यात, मुलीकडे टीईटी परीक्षा पास झाल्याचे बोगस प्रमाणपत्र

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात शिंदे गटातील आणखी एका आमदार अडचणीत आला आहे. आमदार रमेश बोरणारे यांच्या मुलीकडे टीईटी परीक्षा पास झाल्याचे बोगस प्रमाणपत्र आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे बोरनारे  यांच्या मुलीला नोकरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आमदार रमेश बोरनारे अडचणीत आले आहेत. यावर आता त्यांच्याकडून काय भूमिका घेण्यात येणार, हे पाहावे लागेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींना टीईटीची बोगस प्रमाणपत्र मिळाल्याची आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मंत्रिमडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. अखेर अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे आता रमेश बोरनारे यांच्याबाबत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
काय आहे टीईटी घोटाळा?
पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. या प्रकरणात तपास करत असताना २०१९-२० च्या टीईटी परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९-२० मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या सात हजार ८०० उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती.

त्यामध्ये उमेदवरांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार, गुण वाढवून देणे आणि थेट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले होते. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या सात हजार ८०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button