breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतच ‘मोदी मोदी’च्या घोषणा

अहमदाबाद । महाईन्यूज। वृत्तसंस्था ।

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी पक्षप्रमुख प्रत्येक मतदारसंघात सभा घेत आहेत. अशातच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी गुजरातमध्ये एका सभेला संबोधित केले. मात्र या सभेमध्ये अनेक तरुणांनी ओवेसीना काळे झेंडे दाखलत निषेध केला. विशेष म्हणजे काळे झेंडे दाखवत मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ओवेसींना गुजरातमध्ये मोठा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरत पूर्व मतदारसंघात असदुद्दीन ओवेसींची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी व्यासपीठावर भाषण सुरू करताच तेथे उपस्थित लोकांनी घोषणाबाजी करत निषेध केला. तरुणांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले. या घोषणाबाजीने सभेत उपस्थित एआयएमआयएम नेते अस्वस्थ झाले.

ओवेसी यांच्या निषेधाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ओवेसींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी ओवेसी सुरत पूर्व मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वारिस पठाणही उपस्थित होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष जवळपास 36 जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच त्यांना निषेधाचा सामना करावा लागला आहे. ओवेसी यांचा पक्ष गुजरातमध्ये जवळपास 36 जागांवर निवडणूक लढवत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात असदुद्दीन ओवेसी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करत होते, प्रवासादरम्यान ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. ओवेसींना लक्ष्य करत वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याचा आरोप एआयएमआयएमने केला होता. पण एआयएमआयएमचे हे दावे पोलिसांनी फेटाळून लावले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button