ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पहिली भारतीय अभिनेत्री

अनसूया सेनगुप्‍ता हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मुंबई : चित्रपट सृष्टीसाठी आकर्षण ठरणाऱ्या फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा भारतीय सिनेमे आणि कलाकारांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री अनसूया सेनगुप्‍ता हिनं ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

‘शेमलेस’ सिनेमासाठी अनसूया सेनगुप्‍ता हिला हा पुरस्कार मिळालाय. कॉन्स्टेंटिन बोजानोव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात अनसूया सेक्स वर्करच्या भूमिकेत आहे. एका पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर ती दिल्लीच्या रेड लाइट एरियामधून पळून जाते, त्यानंतर काय घडतं? ते या सिनेमात दाखवण्यात आलंय.

कोण आहे अनसूया सेनगुप्‍ता?
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या अन सर्टन रिगार्ड विभागात तिला हा पुरस्कार मिळाला आहे. अनसूया मूळची कलकत्ता इथली आहे. अभिनेत्री व्हायच्या आधी तिनं मुंबईत प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. सध्या ती गोव्यात वास्तव्यास आहे. तिनं नेटफ्लिक्सचा शो ‘मसाबा मसाबा’ साठी सेट डिजाइनचं काम केलं होतं. जाधवपुर विद्यापिठातून तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलंय.

दरम्यान, सिनेमातील भूमिकेची लांबी लहान असली तरी अभिनेत्री छाया कदम हिनं सादरीकरणानं आजवर प्रत्येक सिनेमात स्वतःची छाप सोडली आहे. ‘झुंड’ असो किंवा अलीकडे प्रदर्शित झालेला ‘लापता लेडीज’; तिच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं आहे. पुन्हा एकदा चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी तिनं केलीय. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तिच्या सिनेमाला लोकांनी उभं राहून मानवंदना दिली. तिच्या ‘ऑल वी इमॅजिन ऑफ लाइट’ या सिनेमाचा कान महोत्सवात प्रीमिअर झाला. यावेळी सिनेमा संपल्यावर उपस्थित परदेशी प्रेक्षकांनी आणि थिएटरमधील सर्वांनी या सिनेमासाठी चक्क उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. याक्षणी कॅमेरा छायावर आला तेव्हा त्या प्रेक्षक करत असलेल्या कौतुकानं भारावलेल्या दिसल्या. त्यांनी सर्वांना फ्लाईंग किस देऊन प्रेम दर्शवलं. विशेष म्हणजे ‘ऑल वी इमॅजिन ऑफ लाइट’ या सिनेमासह तिचा ‘सिस्टर मिडनाईट’ हा सिनेमाही ‘कान’मध्ये यंदा प्रदर्शित झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button