breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कट्टरपंथीयांची पोलीस कोठडी वाढवण्यास नकार

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात प्रगती नसल्याचे निरीक्षण नोंदवत जळगावच्या साकळी भागातून अटक केलेल्या लीलाधर लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी या दोन कट्टरपंथीयांची पोलीस कोठडी वाढवण्यास मंगळवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने या दोघांसह गौरी लंकेश हत्येतील भरत कुरणे आणि सुजीत कुमार यांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावली.

कट्टरपंथीयांच्या टोळीने आखलेल्या कटात लोधी आणि सूर्यवंशी ऊर्फ मॅकेनिक सामील होते. कटाच्या अंमलबजावणीसाठी या दोघांनी वाहने चोरली, बनावट नंबर प्लेट तयार केल्या. याशिवाय शस्त्र चालविण्याचे आणि स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले होते. सूर्यवंशी याने पोलीस कोठडीत बॉम्ब बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या दोघांकडून दोन गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले होते. ते सूर्यवंशी याने लोधीच्या मदतीने तयार केल्याचा संशय आहे. नालासोपारा आणि राज्याच्या अन्य भागातून हस्तगत केलेले गावठी बॉम्ब तयार करण्यात या दोघांचा समावेश असावा. या दोघांकडे स्फोटके, शस्त्रसाठा याबाबत अधिक चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button