breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रावेत येथे अनधिकृत रित्या अनेक झाडे तोडली कडक कारवाईची अमोल थोरात यांची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी |

नॅनो होम्स सहकारी गृह रचना संस्था मर्यादित संत तुकाराम महाराज पूल समोर, रावेत, येथे समाजकंटकांनी अनेक झाडे अनधिकृतरीत्या तोडली असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे

यासंदर्भात थोरात यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सूत्रे हलली महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे (प्रशासन) यांनी अमोल थोरात यांना याबाबत सांगितले की मी त्यांना ई-मेल वर कळवले होते की फक्त दिव्या खालचे फांद्यां काढा आणि परवानगी नुसार छाटणी करा, पण ह्यांनी तर पूर्ण वाट लावली. मात्र याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे. प्रशासनाने वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दंड आणि यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन थोरात यांना दिले आहे.

याबाबत अमोल थोरात म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना वृक्षारोपण वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे. महापालिकेने आजवर पर्यावरणाची गरज लक्षात घेऊन पंचवीस लाखाहून अधिक वृक्षारोपण केले आहे. मात्र महापालिकेच्या या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button