breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांनो… 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा – आयुक्त श्रावण हर्डिकर

शहरात समन्यायी पाण्याचे होणार वाटप, अवैध नळ तोडणी व मोटारी करणार जप्त

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी चिंचवड शहरात समन्यायी पाणी वाटप होत नाही. शहराची वाढती लोकसंख्या, अनधिकृत नळ कनेक्शन, सुमारे 40 टक्के पाण्याची होणारी तुट यामुळे दररोज 500 एमएलडी पाणी उचलूनही उंच आणि शेवट नळधारकांपर्यंत पुरेसा व उच्च दाबाने पाणी पुरवठा होत नाही. यामुळे येत्या 25 नोव्हेंबरपासून दोन महिने दिवसाआड पाणी पुरवठा करुन समन्यायी पध्दतीने पाण्याचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली. दरम्यान, अवैध आणि दुबार नळजोड तोडणी, मोटारी जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील पाणी टंचाई सदृश्य स्थितीवर सर्वपक्षीय आज (मंगळवार) बैठक झाली. त्यात हा निर्णय झालेला आहे. यावेळी महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, सर्व गटनेते, प्रभाग अध्यक्ष, काही नगरसेवक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अंदाजे 27 लाखाच्या घरात आहे. गेल्या वीस वर्षात नव्याने पाण्याची योजना अंमलात आणलेली नाही. 1 लाख 50 हजार नळधारकांसाठी दररोज 500 एमएलडी पाणी उचलून सर्व पंपींग स्टेशनद्वारे पुरवठा करतो. तरीही शेवट आणि उंचावरील नळधारकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. पुरेशा पाण्यासाठी दररोज 600 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे.

शहरातील नागरिक प्रतिमाणसी 135 लिटरपेक्षा अतिरिक्त पाणी वापरत आहेत. शेवट आणि उंच सखल भागात असलेल्या वाकड, पिंपळे निलख, पिंपळे साैदागर, दापोडी, दिघी, मोशी, च-होली आदी भागात पाण्याची ओरड कायम आहे. शहराच्या पाण्याची तूट वगळून आज घडीला 400 एमएलडी पाणी पुरेसे आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी वापर कमी करुन नागरिकांना पत्रके वाटून त्यांच्यात जनजागृती करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button