breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी अमित लांडगे यांची निवड

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी अमित शिवाजी लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नुकतेच अमित लांडगे यांना निवडीचे पत्र दिले. मितभाषी असणारे आणि कोणताही बडेजावपणा न ठेवता सर्वांमध्ये सहजपणे मिसळणारे म्हणून अमित लांडगे ओळखले जातात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भोसरी विधानसभा मतदारसंघात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी चांगला फायदा होणार आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना अमित लांडगे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते पार्थ पवार, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर युवकांचे संघटन करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. राजकीयदृष्ट्या शहरातील युवकांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवकांचे राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली संघटन करण्याचा मी प्रयत्न करेन.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण करताना समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा विचार महाराष्ट्रात रुजवलेला आहे. या विचारांचा पाईक बनून भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार व प्रसार करणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवक आघाडीच्या वतीने आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीला येत्या काही दिवसांत गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button