breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मी या दिवशी मुंबईत, रोखून दाखवा’; दिग्दर्शक अमित जानी यांचे मनसेला चॅलेंज

मुंबई : पाकिस्तानातून भारतात सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘कराची टू नोएडा’ या सिनेमात काम करण्याची संधी दिग्दर्शक अमित जानी यांनी दिली. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐकल नाही तर राडा तर होणारच..असा इशारा मनसेने दिला आहे. आता दिग्दर्शक अमित जानी यांनी मनसेवर पलटवार केला आहे.

अमित जानी म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. अमित जानी १९ तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही, असं प्रत्युत्तर अमित जानी यांनी मनसेला दिलं आहे.

हेही वाचा – ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू’; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामुळे राज ठाकरेची पार्टी चिडली आहे. मुंबईला बसलेल्या लोकांच्या हाताला हा चित्रपट लागला नाही. म्हणून ते नाराज आहेत. मनसेमुळे आम्ही एका मराठी खासदाराला अनेक तास बंधक बनवून ठेवलं होतं. आम्ही यूपीतील शिवसेनेच्या कार्यालयात तोडफोड केली होती. आम्ही या चित्रपटावर मुंबईतच काम करणार आणि कोणाच्या धमकीला घाबरणार नाही, असंही अमित जानी म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने नेमकं काय म्हटलं?

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच, असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button