ताज्या घडामोडीमुंबई

#AliBudeshDeath: दाऊदला ठार मारण्याची शपथ घेणाऱ्या गँगस्टरचा बहरीनमध्ये मृत्यू; मुंबईतून पळाला आणि…

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी पंगा घेणारा व दाऊदला ठार मारण्याची शपथ घेणारा गँगस्टर अली बुदेश याचा बहरीनमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अली बुदेश हा मुंबईतील घाटकोपर येथे राहणारा होता. पोलीस व केंद्रीय यंत्रणांना गुंगारा देऊन तो विदेशात पसार झाला होता. गेली काही वर्षे बहरीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले होते. तो स्मगलिंगचे नेटवर्क चालवायचा.

अली बुदेश हा गेल्या काही काळापासून आजारी होता व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत गुन्हेगारी कारवाया करणारा अली बुदेश हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, नंतर अली बुदेश आणि दाऊद या दोघांमध्ये अनेक कारणांनी खटके उडाले. त्यातून ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. अली बुदेश याने तर दाऊदला संपवण्याची शपथच घेतली होती, असे बोलले जायचे.

पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या दाऊद इब्राहिम आणि शकीलने २०२१ मध्ये मुंबईतल्या जान मोहम्मद नावाच्या गँगस्टरला अली बुदेशची हत्या करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार तो बहरीनला दाखलही झाला होता. मात्र, अली बुदेश त्याच्या हाती लागला नव्हता, असेही सांगितले जाते.

दरम्यान, छोटा राजन , बबलू श्रीवास्तव आणि अली बुदेश हे तिघे दाऊदविरुद्ध एकत्र आले होते व त्यांनी दाऊदच्या अनेक हस्तकांना टिपले होते.

स्मगलिंगचे मोठे नेटवर्क

मुंबईतून निसटत देशाबाहेर पसार झालेला गँगस्टर अली बुदेश हा स्मगलिंगचे मोठे नेटवर्क चालवत होता. भारत आणि पाकिस्तानात त्याचे हस्तक काम करत होते. मुंबईत घाटकोपर येथे त्याचे घर होते. त्याचे वडील बहरीनचे नागरीक तर आई मुंबईतील रहिवासी होती. बहरीनमध्ये तो सुरुवातीला कस्टममध्ये काम करायचा, असे सांगितले जाते. त्यामाध्यमातून त्याने बड्या हस्तींशी संपर्क वाढवला व नंतर स्मगलिंगचे नेटवर्क उभे केले. हे नेटवर्क तो तिथूनच ऑपरेट करत होता. गुन्हेगारी विश्वातील दाऊदचे वर्चस्व संपवण्याचा त्याने विडाच उचलला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button