breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

विधानसभा पोटनिवडणूक ः अखेर आघाडीतील तिढा सुटला? कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे?

पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला असून कसबा आणि चिंचवडच्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, हे आघाडीच्या नेत्यांकडून निश्चित करण्याची आल्याची माहिती समोर येत आहे. कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रक काढून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्रे, तर चिंचवड मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण ७८० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी एकूण एक हजार ७२० ईव्हीएम मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व मशीनची पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा या मशिनची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.

Akher Aghaditil Tidha Sutla? Is it from Congress to Ravindra Dhangekar and from Chinchwad to Nationalist Rahul Kalate?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button