breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट : उमेदवार आयात करण्याची नामुष्की; राष्ट्रवादीतील मोठा गट नाराज!

  • दिवंगत जगताप घराण्याला खुली मदत करण्याची तयारी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मोठा गट नाराज असून, जगताप घराण्यातील उमेदवाराचा खुला प्रचार करण्याची तयारी करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवार आयात करु नये. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी, असा ठराव करण्यात आला. मात्र, या ठरावाला पक्षश्रेष्ठींनी केराची टोपली दाखवली.
परिणामी, नाना काटे, भाउसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, मयूर कलाटे, माया बारणे यांच्यासह इच्छुकांमध्ये कामालीची नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रादीतील मोठा गट महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात काम करणार आहे.
दरम्यान, नाराज गटाच्या वतीने एक शिष्टमंडळ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीकरीता रवाना झाले आहे. अजित पवार यांच्याकडे उमेदवार निश्चितीबाबत आपली भूमिका मांडण्याची तयारी करण्यात आली आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

राष्ट्रवादीतील दिग्गज जगताप घराण्यासोबत…

दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या राजकीय मदतीची परतफेड करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीतील दोन बडे नेते जगताप घराण्यातील उमेदवार अश्विनी जगताप यांना मदत करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला तगडे आव्हान असून, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाराजीचा मोठा फटका बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button