breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

Ajmer Dargah 2007 Blast: नर्मदा परिक्रमेसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Ajmer Dargah 2007 Blast: अजमेर दर्गा येथील २००७ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला तब्बल ११ वर्षांनी अटक करण्यात यश आले आहे. सुरेश नायर असे या आरोपीचे नाव असून गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला भरुच येथून अटक केली आहे. त्याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.

अजमेर दर्गाबाहेरील बॉम्बस्फोट प्रकरणात सुरेश नायर हा आरोपी आहे. सुरेश नायरने आरोपींना बॉम्ब पुरवल्याचा आरोप आहे. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १७ जण जखमी झाले होते. ११ ऑक्टोबर २००७ रोजी हा स्फोट घडवण्यात आला होता. नायर हा हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्याचा संबंध होता, असे सांगितले जाते. ओळख लपवण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून सुरेश हा उदय गुरुजी म्हणून वावरत होता. तो स्वत:ला अध्यात्मिक गुरु म्हणायचा. नायर हा नर्मदा परिक्रमेनिमित्त गुजरातमधील भरुच जिल्ह्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या एक पथकाने शुकलतीर्थ येथे नजर ठेवली होती. दोन दिवस पोलिसांचे पथक तिथे नजर ठेवून होते. ‘सुरेश नायरला सुरुवातीला ओळखताच येत नव्हते. तो साधूच्या वेशात होता. त्याची दाढी वाढली होती’, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. नायरला भरुचमधून अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला एनआयएच्या ताब्यात दिले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. एनआयएच्या वेबसाइटवर मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button