breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निवडीनंतर भाजपमध्ये नाराजी; वारंवार डावललं जात असल्याचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शंकर जगताप यांची नियुक्ती होताच शहर भाजपच्या एका गटात नाराजी दिसू लागली आहे.

भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला पक्षाकडून सातत्याने डावललं जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच एकाच परिवारामध्ये पक्षाकडून वारंवार पदे देण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील १२ ते १३ माजी नगरसेवक लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार’; अजित पवार माहिती

याबाबत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यावेळी उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचे नाव पुढे येताच त्यांना चिंचवड विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्वांना तिलांजली दिली जात आहे. आता शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखा आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची घसमट होत आहे. सतत होणारा हा अन्याय सहनशक्तीच्या पलीकडे गेला असल्याचं म्हटलं आहे.

२०१७ मध्ये महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. या यशामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह आमचा ही खारीचा वाटा होता. पक्षाने नवख्या नगरसेवकांना महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, विविध समित्यांचे अध्यक्षपद दिले. पाच वर्षांत प्रत्येक वेळी संधी असतानाही मला वारंवार डावलले. त्यानंतरही मी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो. शहराध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असताना आताही डावलल्याने माझ्यासह चिंचवडमधील १२ ते १३ नगरसेवक नाराज आहेत. सर्व नाराज नगरसेवक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत, असंही शत्रुघ्न काटे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button