breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये – संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना, राज्यातील राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!, असे ट्वीट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरी टीका केली आहे.

मंत्रिमंडळाने राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी राज्यापालांवर निशाणा साधला. जय राऊतांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की,राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!, अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे.

आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. कोरोनामुळे सर्व निवडणुका लांबणीवर गेल्या असून निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button