breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याचा राज्य सरकार विचार – राजेश टोपे

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा घेणार आहेत.याबाबतची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनअंतर्गंत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. पुन्हा जिम आणि शॉपिंग मॉल सुरु कराव्यात का? याबाबत राज्य सरकार विचार करत आहेत. जिम हे जनतेच्या आरोग्यांच्यादृष्टीनं गरजेचं आहे, त्यामुळं यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

तसंच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या. एसटीची सेवा कमी पडतेय असं सांगत शेकडो संतप्त प्रवाशांनी आज नालासोपारा एसटी स्टँडमध्ये प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे रुळांवर घुसून ठिय्या आंदोलन केलंय. या घटनेवरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. लोकल सेवा सुरु करण्याची मागणी अगदीच रास्त आहे मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळलं जाणार नाही, त्यामुळं ट्रेन सुरु करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

मुंबईतील करोनाग्रस्तांचा दर आटोक्यात येत असतानाच पुण्यात आता अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत राबवलेल्या मिशन झिरो प्रकल्पामुळं मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळं मुंबईप्रमाणेच पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, टेस्ट करणे या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सिंगल पॉइंट कॉन्टेक्ट ही प्रणाली तयार केली जाईल. जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहिती मिळेल. असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button