breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

भारतीय संघाच्या पराभवानंतर महुआ मोईत्रांनी भाजपाला डिवचलं; म्हणाल्या..

World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर आपल्या देशाचं नाव कोरलं. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

खासदार महुआ मोईत्रा यांनी ‘एक्स’ (ट्वीटर) अकाउंटवर लिहिलं, अहमदाबादमधील स्टेडियमचं नाव बदललं. जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला.

हेही वाचा – ‘इस्त्रायली पंतप्रधानांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे’; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

दुसऱ्या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा म्हणाल्या, ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघान नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button