‘इस्त्रायली पंतप्रधानांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे’; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास संघटनेत युद्ध सुरू आहे. इस्त्रायलकडून गाझापट्टीवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. दरम्यान, यावरून केरळातील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी मोठं विधान केलं आहे. उन्नीथन यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
खासदार उन्नीथन म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर, युद्ध गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ‘न्युरेमबर्ग ट्रायल’ नावाची पद्धत वापरली गेली. न्युरेमबर्ग ट्रायलमध्ये, युद्ध गुन्हेगारांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय गोळ्या घालून ठार मारण्यात आले. न्युरेमबर्ग मॉडेल पुन्हा राबवण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा – नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत. नेतन्याहू यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची हीच वेळ आहे. कारण त्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे, असं उन्नीथन म्हणाले.