breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘कराची स्वीट्स’ला मनसेचा दणका, पाठवली थेट कायदेशीर नोटीस

मुंबई: मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता ‘कराची स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना दणका दिला आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी या दुकान चालकाला थेट न्यायालयात खेचणार आहे. त्याबद्दल नोटीसही कराची स्वीट्स व्यवस्थापकांना पाठवलेली आहे. मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.

‘देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित ‘कराची स्वीट्स’ या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे’, असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे. या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आलेली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत अनेकवेळा हिंसाचार झाला आहे. दहशतवाद्याची मोठा आधार म्हणून पाकिस्तानने तिथल्या हिंसाचाराला चिथावणी दिली आणि पाठिंबा दर्शवला. पाकिस्तान आपल्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केलेला आहे, आपले जवान यात शहीद झाले आहे, त्यामुळे अशा देशाच्या राजधानी असलेल्या कराची नावाने महाराष्ट्रात व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मनसेनं दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button