breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांनो मौजमस्तीला घाला आळा

महापालिका रात्री संचारबंदी लागू करण्याच्या विचाराधीन

मुंबई | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नाईट क्लब आहेत. रात्रीच्या वेळी याठिकाणी मोठी गर्दी होते. मागील आठवड्यात महापालिकेने लोअर परळ आणि वांद्रेमधील क्लबवर छापा टाकून कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली. त्यामुळे मुंबई महापालिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून वाढती गर्दी लक्षात घेता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार सुरु असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी म्हटले आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून मुंबईमध्ये देखील जानेवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु मुंबईमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मुंबईमध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात करवला 50 व्यक्तींना परवानगी आहे. परंतु पबमध्ये रात्रीच्या वेळी मोठी गर्दी होत असून हजारोंच्या संख्येने याठिकाणी गर्दी आढळून येत आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारला शिफारस केली असून राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button