breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पांडुरंग थोरवे

पुणे | प्रतिनिधी
वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांची निवड झाली आहे. त्यांनी २ हजार ५११ मते मिळवत अ‍ॅड. हेमंत झंजाड यांना पराभूत केले आहे. तर अ‍ॅड. झंजाड यांना १ हजार ३८६ मते मिळाली.

बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विवेक भरगुडे (२ हजार १३९ मते), लक्ष्मण येळे-पाटील (१ हजार ५५० मते), सचिवपदी अ‍ॅड. सुरेखा भोसले (१ हजार ७६८ मते), अ‍ॅड. अमोल शितोळ (१ हजार ८१९ मते), ऑडिटरपदी शिल्पा कदम-बिराजदार (१ हजार ८८५ मते) विजयी झाले आहेत.

खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मतदानावेळी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अशोक संकपाळ आणि सहायक निवडणूक अधिकारी ॲड. मंगेश लेंडघर यांनी कामकाज पाहिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button