breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवावा, एटीएसला ठाणे कोर्टाचे आदेश

मुंबई – एकीकडे “एंटीलिया” बाहेर गाडीत आढळलेल्या स्फोटकांचा तपास एनआयए वेगाने करत असून, या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी असलेल्या (निलंबित) सहायक पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याविरुद्ध सबळ पुरावे सापडू लागले आहेत. तसेच, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासात देखील मुख्य संशयित सचिन वाझे असल्याने याही प्रकरणाचा तपास एनआयएने, केंद्र सरकारला विनंती करून आपल्याकडे घेतला आहे. या आधी हा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती.

वाचा :-परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

दरम्यान, दुसरीकडे केंद्राने हा तपास एनआयएला दिला असला तरी, एटीएसने आपल्या बाजूने तपास सुरूच ठेवल्याने, इथेही केंद्र आणि राज्यातला संघर्ष सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यावरून एनआयएने कोर्टात विनंती याचिका दाखल केली असून, ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.’

एनआयएने कोर्टात दाखल केलेल्या विनंती याचिकेमध्ये, ‘मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवत आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशा पद्धतीचा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आज कोर्टाने हा आदेश दिला.

त्याचबरोबर, एनआयएने मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्टातही अर्ज दाखल केला आहे. अँटीलिया स्फोटके प्रकरणात सचिन वाझे यांच्याविरोधात नवे आरोप ठेवण्यात येत आहेत, असे सांगून उद्या एनआयए कोठडी वाढवून घेण्याच्या प्रयत्नात एनआयए आहे. आज तातडीने एक अर्ज दाखल केला आहे. त्यातील तपशील तात्काळ उपलब्ध होऊ शकलेला नाही. मात्र, उद्या संपत असलेली कोठडी या अर्जाच्या आधारे वाढवण्याची विनंती कोर्टाला करण्यात येणार असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button